Breaking News

डिकीतील ७९ हजार चोरट्यांनी लांबवले

कोपरगाव | शहरातील गजबजलेल्या भागातून सुझुकी अॅक्सिसच्या डिकीतून चोरट्यांनी ७९ हजार रुपये लांबवले. गुरुवारी सकाळी मधुकर अण्णासाहेब नरोडे (जानकी विश्व, येवला रस्ता) हे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरणा करण्यासाठी गेले होते. बँकेत गर्दी असल्याने ते दुसऱ्या कामासाठी बसस्थानकासमोरील ओरिएन्टल इन्शुरन्सच्या कार्यालयात धनादेश देण्यासाठी गेले. ती संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या गाडीच्या डिकीत असलेले ७९ हजार रुपये घेऊन पोबारा केला. शहरातील नागरिकांच्या संख्येचा विचार करता चोरांची संख्या कमीच आहे. चोर बाहेरील असल्याने ते सापडत नाहीतय नागरिकांनीच आपले पैसे व्यवस्थित सांभाळावेत, असा सल्ला पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी नरोडे यांना दिला.