Breaking News

एका राजकीय पक्षाचा मला मारण्याचा कट -ममता बॅनर्जी


कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दावा केला आहे, की एक राजकीय पक्ष राजकीय फायदा मिळविण्याच्या हेतूने त्यांना मारण्याचा कट आखत आहे. एवढेच नाही, तर यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारीही देण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या. मात्र यासंदर्भात त्यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा म्हणाल्या, मला माहीत आहे की, एक राजकीय पक्ष मला मारण्याचा कट आखत आहे. यासाठी त्यांनी सुपारीही दिली आहे. कॉन्ट्रॅक्ट किलरला अ‍ॅड्व्हान्सदेखील देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर माझ्या घराची आणि कार्यालयाची टेहाळणीदेखील करण्यात आली आहे.