Breaking News

मुंजेवाडी-खुंटेवाडी, मतेवाडी ग्रामपंचायतीत फुलले भाजपाचे कमळ

जवळा / प्रतिनिधी । तालुक्यातील मतेवाडी व मुंजेवाडी-खुंटेवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलले आहे. मतेवाडीच्या सरपंच पदासाठी महानंदा मते यांची यापूर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली होती. सात सदस्यांच्या जागांपैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या. इतर तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल होऊनही माघार घेतल्यामुळे, या तिन्ही जागा रिक्त राहिल्या आहेत. मतेवाडीमध्ये बिनविरोध निवड होत असतानाही उमेदावरांनी दाखल केलेले अर्ज काढून घेतले. मुंजेवाडी-खुंटेवाडीच्या जानकबाई ठकाण यांच्यासह चार सदस्य विजयी झले. तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. मतेवाडीचे सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. या जागेवर महालक्ष्मी मते यांची निवड बिनविरोध झाली.तर तीन प्रभागातील सात सदस्यांच्या जागेवर चंद्रकला मते, लक्ष्मण पागीरे, सुखदेव मते, सागर कसरे या चौघांची बिनविरोध निवड झाली. इतर तीन जागांसाठी दाखल केलेले अर्ज काढून घेतल्याने सदस्यपद रिक्त ठेवल्याने मतेवाडीत निरुत्साह दिसून आला.