मोदी सरकारच्या 3 वर्षांची कामगीरी जनतेपर्यत पोहोचविण्यास प्रारंभ
नाशिक, दि. 01 - केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण झाल्याने सरकारच्या या काळात राबविण्यात आलेल्या योजना आणि घेतलेले विविध लोकोपयोगी निर्णय याची माहिती जनतेला व्हावी यासाठी ध्वनिचित्रफीत असलेली एल.ई.डी. व्हॅन महानगरातील चौका-चौकात फिरणार आहे. त्याचा शुभारंभ काल (दि.31 मे) प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी,महापौर रंजना भानसी, गटनेते संभाजी मोरूस्कर, ज्येष्ठनेते विजय साने आणि सरचिटणीस पवन भगुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी लक्ष्मण सावजी, विजय साने, सुजाता करगीकर,असाने आदींची भाषणे झाली. गेल्या तीनवर्षांत मोदी सरकारने घेतलेल्या अनेक धाडसी आणि क्रांतिकारी निर्णयांनी जनता खुश असून त्यामुळे विविध निवडणुकांत भाजपाच्या विजयाची घोडदौड कायम आहे. 325 पेक्षा अधिक जागा जिंकून भाजपाने उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्यही काबीज केले. अनेक राज्यांत विरोधीपक्ष तर औषधालाही उरलेला नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची शासनपद्धती आमुलाग्र बदलली आहे. देशाने शाश्वत विकासाच्या दृष्टीने आश्वासक वाटचाल सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा उंचावल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले. स्वच्छ भारत योजना, गरिबांसाठी सुरक्षा योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, मुद्रा योजन, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, उज्वला गॅस योजना, जीएसटी करप्रणाली, अधिकारांचे विकेद्रीकरण, काळा पैशाविरुध्द लढा, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासन आदी विविध योजना आणि उपक्रमामुळे समाजातील सर्व घटकामध्ये मोदी सरकारबद्दल आपुलकीची भावना वाढली आहे. सर्जीकल स्ट्राईक करुन आमच्याकडे वाईट नजरेने पाहिल्यास याद राखा असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिल्याची आठवणही यावेळी करुन दण्यात आली.
काल ही व्हॅन नंतर रामकुंड, मखमलाबाद नाका, काटया मारुती चौक, आडगांव येथे फिरविण्यात आली. मोदी सरकारच्या 3 वर्षाच्या कामगिरीची माहीती जनतेला करुन देण्यात येत होती. यावेळी लोकांकडून कूपन भरुन घेण्यात आले. भाग्यवंताना एलईडी बल्बचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी भाजयुमोचे महानगर अध्यक्ष अजिंक्य साने, नगरसेवक सुरेश खेताडे, पुनम धनगर, प्रियंका माने, पंचवटी मंडल अध्यक्ष दिगंबर धुमाळ, धनंजय बेळे, नंदकुमार देसाई, लक्ष्मण मंडाले, अमित घुगे, ललिता भावसार, मोहीनी भगरे, रेखा गिते, मंजुशा लोहगावकर, क्षितीजा खटावकर, मंगला शिंदे, ऋषिकेश आहेर, सागर परदेशी, जयेश चंदनकर, गणेश अवनकर, अनिल वाघ, धनंजय पुजारी, खंडेराव पाटील, दिपक सानप, चंद्रशेखर पंचाक्षरी, विपुल सुराणा, आदीसह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.