सोलापूर, दि. 30, मे - सोशल मीडियावरून जागोजागी मुलांचे अपहरण करून शरीरातील किडनी व अन्य अवयव काढून घेणारी टोळी कार्यरत असल्याची बातमी पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवले जात आहे. पण कलबुर्गी जिल्ह्यात कुठेही मुलांच्या अपहरणाची घटना घडली नाही. नागरिकांनी अशा भीती पसरवणार्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आळंदचे पो लिस उपअधीक्षक एस. एच. विजयकुमार यांनी केले. विजयकुमार म्हणाले, कुठल्यातरी घटनांचे फोटो व व्हिडिओ अपलोड करून त्याद्वारे मुलांचे अपहरण केले जात आहे. तेव्हा नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन केले जात आहे. कामासाठी परगावहून आलेल्या अपरिचित निष्पाप व्यक्तींना पकडून मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकरणी संबंधितांविरुद्ध कडक कारवाई क रण्यात येईल. कलबुर्गी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात सर्वत्र याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या वेळी महेश सुरे, माजी नगराध्यक्ष मोईज कारभारी, माजी नगरसेवक गुलाम हुसेन टप्पेवाले, तुळशीराम यांनीही आळंद येथे मुलांच्या अपहरणाची एकही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले. या वेळी मंडल पोलिस निरीक्षक एच. बी. सन्मनी, फौजदार पी. सुरेशबाबू आदी अधिकारी उपस्थित होते.
आळंदमधील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - एस. एच. विजयकुमार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:15
Rating: 5