Breaking News

केसापुर येथील प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधार्‍याचे जलपुजन


श्रीरामपूर - राहुरी शिवालगत असणार्‍या केसापुर येथील प्रवरा नदीवरील केटीवेअर पुर्ण क्षमतेने भरण्यात आले आहेत. दरम्यान निळवंडेतुन शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान केसापूर केटीवेअर बंधार्‍याचे जलपूजन आ. भाऊसाहेब काबंळे, पं.स. सभापती दिपक पटारे, जि.प.सदस्य शरद नवले, आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या जलपुजन प्रसंगी बंधारा पाणी कृती समितीचे अध्यक्ष वसंतराव कोळसे, तनपुरे सा.का. संचालक बाळकृष्ण कोळसे, ज्ञानदेव पवार, सिताराम ढुस, दादा मेहेञे, अच्युत जाधव, विजय डुकरे, विनायक कोळसे, उद्धव कोळसे, दादा साळुंके, गिताराम डुकरे, शिवाजी कोळसे, अरुण कोळसे, कुंडलिक खपके आदि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.