Breaking News

तालुक्यातील विकासाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार गडाखांना नाही -आमदार मुरकुटे.


पानेगाव - नेवासा तालुक्यातील विकासाबाबत बोलण्याचा अधिकार माजी आमदार शंकरराव गडाख यांना नसल्याचे प्रतिपादन आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. पानेगाव (ता.नेवासा) येथील मुळा नदीवरील बंधार्‍याचा जलपुजन निमित्त कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळाथडी पाणी समितीचे जेष्ठ संचालक कृपाचार्य जाधव होते. यावेळी आमदार मुरकुटे यांनी म्हटले की , आमदार शिवाजी कर्डीले व मी सातत्याने चार वर्षापासून बंधारे भरून देत आहे. यामध्ये मुळाथडी समितीचे मोठे योगदान असल्याचे आ. मुरकुटे यांनी सांगितले. माजी आमदार गडाखांनी आगोदर मागिल पाच वर्षाच्या कामाचा हिशोब द्यावा. त्यांच्या पाच वर्षात एकदाही मुळानदीवरील बंधारे भरले नसून जनतेने मला आमदार केल्यापासून सलग चार वर्षांपासून नदीवरील बंधारे भरत आहे येथून पुढे कायमस्वरुपी बंधारे भरण्यासाठी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, राज्य मंत्री विजय शिवतारे तसेच आमचे सहकारी आमदार शिवाजी कर्डिले यांनी तरतूद करण्यात आली असल्याचे आमदार मुरकुटे यांनी यावेळी सांगितले. 

नदीवरील दोन बंधार्‍याच्या मधोमध भुजल पातळी वाढ होण्यासाठी भुमिगत प्रोफाइल वॉल बंधारे बांधणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने हे सर्व करत आसुन चार वर्षात अनेक कामे मार्गी लावले असुन रस्ते, पाणी, गावातील अनेक छोटे मोठे कामे झाली असुन लवकरच मुळाथडी परीसरातील सर्व रस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुळाथडी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप, रासपचे युवा जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, एकनाथ जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी पानेगावचे उपसरपंच रामभाऊ जंगले, शिवप्रहार संघटनेचे किशोर जंगले, समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर, विजय विटनोर , राजेंद्र जंगले, विठ्ठल जाधव,राजेंद्र जंगले, दिगंबर जाधव,भाऊसाहेब काकडे, पाराजी गुडधे, पाटबंधारे विभागाचे आर एस शेळके, रावसाहेब बाचकर, ज्ञानेश्‍वर शेलार ,दशरथ जंगले, संभाजी जाधव,भाऊसाहेब वाघमारे, दिनकर टेमक,अशोकराव काळे,तुकाराम फुलसौंदर, कचरू जंगले, मोहन जंगले आदि उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक विलासराव सौंदोरे यांनी केले. तर आभार विजय जंगले यांनी मानले.