Breaking News

पत्रकार संघाच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी रमेश शिंदे


नेवासा  - महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी पत्रकार रमेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविदास बैरागी व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामनाथ जर्‍हाड , जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांच्या उपस्थितीत रमेश शिंदे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी नेवासाफाटा येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकी प्रसंगी नेवासा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे तालुकाध्यक्ष- रमेश शिंदे, उपाध्यक्ष- सोमनाथ कचरे, कार्याध्यक्ष- अजय कोळेकर, संघटक-काकासाहेब नरवणे, सचिव-अंबादास सरोदे, कार्यकारिणी सदस्य- कारभारी कर्जुले, सतीश उदावंत उपस्थित होते.