Breaking News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार गांधींच्या निवासस्थानी दूध अभिषेक


शेवगाव - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी अभिषेक घालण्यात आला. दुधाचे कोसळत असलेले भाव, कांद्याचे कोसळत असलेले भाव , पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोग लागू करा अशा विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी अभिषेक करण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली . तसेच सरकारचा निषेध व्यक्त करून एकच गट्टी राजू शेट्टी अशा आशयाच्या घोषणा शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आल्या. यावेळी खासदार गांधी यांच्या वतीने शेतकर्‍यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून येथे कोणीही निवेदन स्वीकारायला येत नसते असे सांगून आंदोलन थांबवण्यास सांगितले व शेतकर्‍यांनी पोलिसांचे विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेतले. यावेळी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे , स्वप्नील खाडे , हनुमान उगले , अशोक गायकवाड, भीमराव लेंडे, दत्ता फुंदे, शरद मरकड, प्रतापराव पठारी, शंकरराव लहारे, ज्ञानेश्‍वर सोडणार, शंकर सुरवसे, नवनाथ बडे आधी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी आंदोलनाला उपस्थित होते.