भाजपचे राजेंद्र गावित यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बाजी मारली
राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना सुमारे 2 लाख 43 हजार 210 मतं मिळाली.
बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनीही 2 लाख 22 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किरण गहला यांना जवळपास 71 हजार मतं मिळाली.