Breaking News

ऑनलाईन दाखल्यात चिरीमिरी


नाशिक हरिभाऊ सोनवणे - दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी जातीचा, उत्पन्नाचा, डोमिसेल अशा विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी शहरातील ठिकठिक ाणच्या सेतु कार्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे हे दाखले देण्यासाठी संबंधित असलेल्या अधिकार्‍यांकडून चक्क 10 ते 15 रूपयांची मागणी करण्यात येत असल्याचा धक्क ादायक प्रकार समोर आला आहे.
शासनाने ऑनलाईन यंत्रणा तयार करून एक प्रकारे संबंधित आदीकार्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी मुक्त व्यासपीठं तयार करून दिले की काय अशी शंका निर्माण होत आहे.
मूळात आपली यंत्रणा दोषयुक्त आहे, जन्म महाराष्ट्र म्हणजे भारतात झाला तरी डोमिसेल दाखला काढावा लागतो, वास्तविक पहिलीच्या दाखल्यावर जन्म देश जात याचा उल्लेख असतोच असे असताना पुन्हा या दाखल्याची गरज का पडते हे न सुटणार कोडं आहे, या सर्व फेर्‍यात विद्यार्थ्यांना जाव लागते दाखला मिळवण्यासाठी आता शहरात88 ठिकाणी खाजगीकरणातून सेतू कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. काम वेळेत व्हावे म्हणून हे कार्यालय सुरू करण्यात आली असली तरी या कार्यालयातून संबंधित अधिकारी एका दाखल्यासाठी 10ते15 रूपयांची मागणी करीत असल्याचा प्रकार चर्चेचा विषय झाला आहे. रक्कम न दिल्यास तीन दिवस आत मिळणारा उत्पन्नाचा दाखला एक महिना मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. वास्तविक गलेलठ्ठ पगार घेणार्‍या तहसिलदार, नायब तहसिलदारांनाही बाब शोभते का हा कळीचा मुद्दा आहे.
शासनाने गाजावाजा करून भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी तयार केलेल्या या सेतू कार्यालातून अधिकारीच लाचेची मागणी करीत असतील तर धन्य भाजप सरकार असेच म्हणत अच्छे दिनाचे स्वप्न पहायला हरकत नाही.