कर्ज मंजुरीवर दहा लाखांची मागणी करत धमकावले
सोलापूर, दि. 07, मे - आमच्यामुळेच तुमचे बँकेमध्ये कर्ज प्रकरण झाले आहे. त्याच्या मोबदल्यात 10 टक्क्यांप्रमाणे दहा लाख रुपये द्या,’ असे म्हणत दमदाटी करत मुलास अपहरण करण्याची धमकी दिलेल्या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात झालेली आहे. शिवपुत्र लच्चाण यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सिकंदर शेख ऊर्फ हमीद लाल अहमद शेख व दीपक बनसोडे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शेख व बनसोडे आदी चौघांनी फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन त्यांना अशी दमदाटी केली.