Breaking News

भांबोरा सोसायटीच्या चेअरमनपदी माणिक लोंढे


कुळधरण : कर्जत तालुक्यातील भांबोरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माणिक किसन लोंढे व व्हाईस चेअरमनपदी अमृत विठोबा कोरे यांची बिनविरोध निवड झाली. भैय्यासाहेब पाटील व मोहन लोंढे यांचा ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राजीनामे दिल्याने हे पद रिक्त होते. सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्याने लोंढे यांची निवड बिनविरोध झाली. 

निवडीनंतर पदाधिकार्‍यांचा ग्रामपंचायत व भांबोरा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक भैय्यासाहेब पाटील, राजेंद्र लोंढे, मोहन लोंढे, अंकुश गावडे, एकनाथ रणदिवे आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.