Breaking News

सी. बी. एस. ई दहावीच्या परीक्षेत ‘प्रवरा’चे सुयश


प्रवरानगर प्रतिनधी - मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या सी. बी. एस. ई. च्या दहावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा ९८ टक्के निकाल लागला. या परीक्षेत सिद्धार्थ संजीव याला ५०० पैकी ४६९ अर्थात ९३. ८ टक्के, साक्षी रवींद्र ताजणे हिला ५०० पैकी ४६९, {९३.८ टक्के}, अनुजा सुरेश तुरकणे हिला ५०० पैकी ४६४, {९२.८ टक्के} आणि अभिषेख भास्कर पठारे या विद्यार्थ्याला ५०० पैकी ४५४, {९० टक्के} गुण मिळाले, अशी माहिती प्राचार्या स्वाती लोखंडे यांनी दिली. 

या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर, सेंट्रल पब्लिक स्कूलचे डायरेक्टर कर्नल डॉ. भारत कुमार सिंग आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.