Breaking News

मोदी सरकारने युवकाचा भ्रमनिरास केला ,- सत्यजित तांबे


अहमदनगर - नरेंद्र मोदी च्या केंद्रातील भाजप सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार ने सर्वांसह युवकाचा भ्रमनिरास केला आहे त्यामुळे येत्या काळात जनजागृती करून त्यांनी कसा विश्वासघात केला आहे हे लोकांना सांगितले जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले

आज २६ मे ला काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर केल्या जाणाऱ्या विश्वासघात दिवस पाळणार आहे त्यानिमित्त ते पुढे म्हणाले . नरेंद्र मोदींनी चार वर्षात निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी आणि भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. प्रत्येक वर्षी देशाची आर्थिक, सामाजिक स्थिती खालावत असताना केंद्रातील आणि विविध राज्यातील भाजपची सरकारे जनतेच्या पैशांवर हजारो कोटींच्या जाहिराती देऊन उत्सव साजरा करित आहेत. मोदींनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष 26 मे हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा करित आहे.

आज कृषी क्षेत्रातदेशात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांमध्ये 41.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. चार वर्षात 44 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत एकट्या महाराष्ट्रात 15 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.दररोज 35 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करित आहेत.

युपीए सरकारच्या काळात कृषी विकास दर 4.5 टक्के होता तो आता 1.9 टक्क्यांवर आला आहे.मोदींनी 2022 पर्यांत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते मात्र गेल्या चार वर्षात शेतीमालाला हमीभावही मिळत नाही.मोदी सरकारने आपल्या उद्योगपतीमित्रांचे 2 लाख कोटींचे कर्ज माफ केले पण शेतक-यांना मात्र कर्जमाफी दिली जात नाही.

काँग्रेसची सत्ता असणा-या कर्नाटक आणि पंजाब सरकारने शेतक-यांची कर्ज माफी केली मात्र भाजपची सत्ता असणा-या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा करून एक वर्ष उलटले तरी शेतक-यांची कर्ज माफ झाली नाहीत.89 लाख शेतक-यांचे 34 हजार कोटींचे कर्ज माफ करू अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती एक वर्ष झाले मात्र 20 लाख शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. ऊलट ऑनलाईनच्या नावाखाली सरकारकडून शेतक-यांचा छळ सुरु आहे. युपीए सरकारच्या काळात शेतीमालाच्या आधारभूत किंमतीत दरवर्षी सरासरी 15 टक्क्यांची वाढ केली जात होती मोदी सरकारच्या काळात ही वाढ 3टक्क्यांपेक्षा कमी आहे.एकीकडे देशातील शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नसताना मोदींनी परदेशातून डाळ आयात केली तर पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

दरवर्षी विमा कंपन्यांना 20 हजार कोटींचा फायदा होत आहे.,ट्रॅक्टर आणि कृषी औजारांवर 12 टक्के जीएसटी लावला आहे.,कोल्ड स्टोरेज फुड ग्रेन चेनवर 18 टक्के जीएसटी लावला आहे.युवक मोठ्या संख्येने बेरोजगार होत आहे , जगातली सर्वात जास्त बेरोजगारी असलेला देश भारत बनतोय.

बेरोजगारी हे देशासमोरचे सर्वात मोठे संकट आहे.

मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे परिस्थीती गंभीर झाली आहेदरवर्षी 2 कोटी तरूणांना नोकरी देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते.

चार वर्षात आठ कोटी तरूणांना नोकरी मिळायला हवी होती पण 8 लाख तरूणांनाही नोकरी मिळाली नाही. चार वर्ष सत्ता भोगल्यानंतर आता मोदी सांगतात पकोडा विका, आणि भाजपचे त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणतात तरुणांनी नोकरीच्या मागे लागण्याऐवजी पानटपरी टाकावी. मोदी आणि विपल्व देव यांना आमचे सांगणे आहे 2019 ला जनता तुम्हाला पकोडे तळायला आणि पानं टपरी टाकायला आताच जागा ठेवून द्या.

तांबे पुढे म्हणाले या सरकारच्या काळात रोज नवनवे घोटाळे समोर आहेत आणि विजय माल्या, निरव मोदी आणि मेहुल चोकसी सारखे घोटाळेबाज लोकांच्या कष्टाचे हजारो कोटी रूपये घेऊन सरकारच्या आशिर्वादाने विदेशात पळून जात आहेत.निरव मोदी आणि मेहुल चोकसी राष्ट्रीयकृत बँकांचे 28 हजार 484 कोटी रूपये घेऊन परदेशात पळाले.अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर नोटाबंदीच्या काळात अचानक 16 हजार पटीने वाढला. नोटाबंदी हा एक मोठा घोटाळा आहे हे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस सरकारने राफेल विमानाची किंमत प्रति विमान 526 कोटी रूपये ठरवली होती मात्र मोदींनी तेच विमान 1670 कोटी रूपयांना खरेदी केले. राफेल खरेदीत अनिल अंबानींच्या कंपनींच्या फायद्यासाठी देशाचे 12 हजार कोटींचे नुकसान झाले हा एक घोटाळा आहे.सत्तेवर आल्यास परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख टाकू असे आश्वासन मोदींनी दिले होते मात्र विदेशातून काळा पैसा आला नाही आणि लोकांच्या खात्यात 15 लाख रूपये ही आले नाहीत उलट विजय माल्या, निरव मोदी, मेहुल चोकसी, ललित मोदी हजारो कोटींचा पांढरा पैसा घेऊन परदेशात पळून गेले सरकार त्यांना परत आणू शकली नाही.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली आहे.देशाची अंतर्गत सुरक्षा आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा इतिहासात कधी नव्हे एवढ्या असुरक्षित आहेत.भाजपचे सरकार आल्यापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 2555 पेक्षा जास्त वेळा सीमेपलीकडील अतिरेक्यांनी घुसखोरी केली. त्यांच्या हल्ल्यात 350 पेक्षा जास्त जवान आणि 201 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार नागरिक व 4000 जवान जखमी झाले आहेत. 36 शाळा अतिरेक्यांनी आणि फुटीरवाद्यांनी जाळल्या आहेत.गेल्या चार वर्षात नक्षली हिंसाचाराच्या 4158 घटना घडल्या असून नक्षल्यांनी 447 नागरिकांची हत्या केली असून 295 जवान शहीद झाले आहेत.

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अनिश्चित, अपरिपक्व आणि अस्थिर झाले आहे.चीनी उत्पादनांची आयात 60 हजार कोटींच्या पुढे गेली आहे मेक इन इंडिया पूर्णपणे फ्लॉप झाले आहे.भारताचा सर्वात विश्वासू साथीदार असणा-या रशियाने पाकिस्तानला शस्त्रास्त्र विक्रीवर असणारी बंदी उठवली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एक विश्वासू मित्र गमावला आहे.अमेरिकन सरकारने व्हिसा नियामात केलेल्या बदलामुळे परदेशातील नोक-या धोक्यात आल्या आहेत. पाच कोटी भारतीय आयटी कंपन्यांना याचा मोठा फटका बसला आहे.मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा आर्थिक विकास दर निचांकी पातळीवर पोहोचला

औद्योगीक क्षेत्राची मोठी घसरण झाली आहे मेक इन इंडिया सपशेल फेल झाले आहे.परदेशी गुंतवणुकीत मोठी घट झाली आहे. लाखो कोटींच्या थकीत कर्जामुळे देशातील बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत.बँकांचा NPA 4.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.निर्यातीत 46 टक्क्यांची घट झाली आहे.मोदी सरकार चुकीच्या पध्दतीने जीएसटीची अंमलबजावणी करित असल्याने देशभरातील व्यापारी अडचणीत आले आहेत.जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीतून भाजप सरकारने कररूपी दहशतवाद सुरु केला आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आल्यानंतर 16 मे 2014 रोजी जागतिक पातळीवर १०८ डॉलर प्रति बॅरल असलेले कच्च्या तेलाचे दर आज 75 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास असताना पेट्रोल, डिझलचे दर हे 2014 साली असलेल्या दरापेक्षा अधिक तर आहेतच पण उच्चांकी पातळीवर पोहचलेले आहेत.राज्यात पेट्रोलचे दर 85 रू. प्रति लिटरपेक्षा जास्त आहेत.इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणावे ही काँग्रेस पक्षाची मागणी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खासगी पेट्रोलियम कंपन्यांच्या फायद्यासाठी देशाला महागाईच्या खाईत लोटत आहेत.

हे सरकार हुकूमशाही करत आहे प्रसार माध्यमांवर सरकारची दहशत, सोशल मिडीयावर लोकांचे आवाज दाबले जात आहेत,विचारांपेक्षा जाहिराती महत्वाच्या ठरत आहेत,,व्यक्तिस्वातंत्र्याला समाजद्रोह ठरवलं जात आहे,,सरकार विरोधाला राजद्रोह ठरवलं जात आहे,प्रश्न विचारण्याची सोय बंद करून फक्त 'मन की बात' ऐकण्याची सक्ती केली जात आहे. मोदींनी चार वर्षात देशातल्या जनतेचा विश्वासघात केला आहे. यामुळे काँग्रेस पक्षाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात सरकारची पोल खोल करण्याचा निर्णय घेतला आहे...म्हणून आज काँग्रेस पक्ष विश्वासघात दिवस पाळणार आहे.