Breaking News

सिंधुदुर्ग पोलिसांची गुजरात मध्ये मोठी कारवाई


सिंधुदुर्ग, दि. 02, मे - संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यात रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकमधील लाखो रुपयांचा माल लंपास करणार्‍या ताडपत्री गँँगमधील दोन म्होरक्यांच्या मुसक्या आवळण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरात गोध्रा येथे जावून ताडपत्री गँँगच्या मुस्ताक भागालीया या मास्टर माइंडला अत्यंत हुशारीने बेड्या ठोकल्या.

राज्यासह इतर भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधील लाखो रुपयांचा माल लुटून अनेकांना ताडपत्री गँँगने हैराण केले होते . 1 एप्रिल रोजी रात्री कुडाळ राज हॉटेल समोर आणि तळेरे क ोचरेकर पेट्रोलपंप येथे उभ्या असलेल्या ट्रकची मागील ताडपत्री फाडून आतील खसखस, इलेक्ट्रिक सामान आणि डिझनी फ्रोझन हँँडवॉश असा एकूण 7 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञातांनी चोरून नेला. ताडपत्री फाडून केलेल्या चोरीचा प्रकार अनेक ठिकाणी सारखाच असल्याने या चोरी मागेही कुविख्यात ताडपत्री गँँगचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. 

याबाबत पोलिसांनी शोध मोहीम राबविल्यानंतर ताडपत्री गँँगचे हे कृत्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी गुजरात मध्ये जाऊन या गँगचा मास्टर माईंड मुस्ताक अब्दुल भागलीया उर्फ फटाकी या कुविख्यात चोरट्यासह त्याचा साथीदार सुलेमान उर्फ सुलिया अब्दुल गणी कठडी याच्या मुसक्या आवळल्या. या चोरीतील माल अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील व्यापारी विनोद भगवानदास बनिया उर्फ वाणी यांस विकला होता. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाय चोरीस गेलेल्या इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचा 1 लाख 73 हजार 930 रुपये किमतीचा माल चोरट्यांनी क ाढून दिला. तसेच क्रेटागाडी आणि ट्रक मधून 23 लाख 73 हजार 930 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबाबत महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो चालक संघटनेचे संचालक प्रक ाश गवळी यांच्यासह पदाधिकार्‍यांना जिल्हा पोलीसा अधीक्षक कार्यालय येथे जाऊन पोलिसांचे अभिनंदन केले.