रणजीत हांडेंच्या काळातील डेब्रीज घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश सुर्यवंशी- हांडेची मिलीभगत डेब्रीज घोटाळ्याला कारणीभूत
मुंबई/विशेष प्रतिनिधी । कायदा धाब्यावर बसवून बनावट कामावर वीस लाखापेक्षा अधिक शासकीय निधीचा खर्च दाखविण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीत एकाच दिवशी आठशे तीस मजूर आणण्याचा विक्रम करणारे रणजीत हांडे यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्याने यापुर्वीच्या चौकशीत दाबलेले अर्धसत्य बाहेर येऊन रणजीत हांडे यांचे कृष्णकृत्य उघड होण्याचे संकेत आहेत.
मंत्रालयातील डेब्रीज घोटाळ्याच्या चौकशीतून केवळ अर्धसत्य बाहेर आले असून पुर्ण सत्य बाहेर येण्यासाठी अपहाराची पुर्नचौकशी करून दि. 23 मार्च ते 24 नोव्हेंबर 2015 या कालावधीतील कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांनी केलेले टेंडर, वर्कऑर्डर तपासण्याची मागणी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केली होती. दरम्यान, बहुचर्चीत डेब्रीज घोटाळ्यात मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी आणि शहर इलाखाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि नाशिक साबांचे विद्यमान अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांचे संगनमत असल्याची चर्चा साबांत आहे.
सन 2015-16 या आर्थिक वर्षात मंत्रालय इमारतीतील डेब्रीज काढण्यासाठी टेंडर प्रस्तावित झाले होते. जेव्हा हे टेंडर प्रस्तावित झाले, तेंव्हा मंत्रालयातील साफसफाईचे काम क रण्यासाठी मे. सुमित फॅसिलीटीज या कंपनीला चार कोटी पंच्याऐंशी लाख पंचवीस हजार नऊशे चाळीस रूपयांचा ठेका दिला गेला होता. कंपनीचे हे काम सुरू असताना तत्क ालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांनी मंत्रालयातील डेब्रीज काढण्याचे नवे टेंडर काढले. सात वर्क आर्डर करून शेकडो ट्रक्स डेब्रीज बाहेर काढल्याची नोंद मोजमाप पुस्तिके त करून घेतली. मोजमाप पुस्तिकेत केलेल्या नोंदी पाहिल्यानंतर रणजीत हांडे यांच्या सारखा बाहुबली अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला लाभल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसते. दि. 14/8/2015 रोजी रणजीत हांडे यांनी काढलेल्या वर्क ऑर्डरप्रमाणे मोजमाप पुस्तिका क्रमांक 0183751 मधील नोंदी विनोदाचा क ळस करतात. या नोंदीप्रमाणे दि. 17/8/2015 रोजी मंत्रालयात विविध ठिकाणी तब्बल आठशे तीस मजुर साफसफाई म्हणजे डेब्रीज काढण्यासाठी राबत होते, हे एवढे मनुष्यबळ रणजीत हांडे यांना मुंबईत कुठे उपलब्ध झाले, हा प्रश्न नोंद करणारालाही पडला नाही हे आश्चर्य. या मजुरांनी वापरलेले 250 फावडे, 250 कुदळी, 250 टिकाव आणि तेवढ्याच टोपल्यांना मोजमाप पुस्तिकेत स्थान देण्यात आले आहे, त्याची नोंद कुणी कशी ठेवली? ही सामुग्री शासनाची, कंत्राटदाराची की मजुरांची? मजूरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी सुपरवायझर किती? हे सारे प्रश्न मोजमाप पुस्तिकेतील त्या नोंदी निर्माण करीत आहेत.
या एकाच नोंदीवरून रणजीत हांडे यांनी त्यांच्या काळात काढलेल्या वर्क ऑर्डर केवळ भ्रष्टाचाराच्या हेतूने काढल्या आणि प्रत्यक्ष कामे न करता कागदावर बनावट नोंदी करून 20.52 लाखाच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट होत असल्याने रणजीत हांडे यांची चौकशी व्हावी, अशी आ. चरणभाऊ वाघमारे यांची मागणी आहे.
आ. चरणभाऊ वाघमारे यांनी यापुर्वी मागणी केल्याप्रमाणे डेब्रीज घोटाळ्याची चौकशी झाली. त्यातून अर्धसत्य बाहेर आले, अर्धसत्य मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी झाकून ठेवले, असा संशय व्यक्त केला जात असून त्यासाठी रणजीत हांडे यांच्या काळातील वर्क आर्डर 93/- दि. 3/8/2015, 292/ दि. 14/8/2015, 300/- दि. 14/8/2015, 302/- दि. 14/8/2015, 334/-दि. 14/8/2015, 848/- दि. 19/8/2015 या वर्कआर्डरची चौकशी व्हावी अशी मागणी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन चंद्रकांतदादा यांनी या वर्क आर्डरच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशी आदेशामुळे मुंबई साबां अधीक्षक अभियंता यांनी दाबलेले अर्धसत्य बाहेर येऊन रणजीत हांडे यांचे कृष्णकृत्य चव्हाटयावर येईल अशी चर्चा मुंबई साबांत आहे.
शाखा अभियंता मंडगेंचा कार्यकाल संशयास्पद
दि. 23/3/2015 ते 24/11/2015 या कालावधीत शहर इलाखा विभागात कार्यकारी अभियंता असलेले रणजीत हांडे यांनी मलबार शाखेसाठी मंडगे नामक शाखा अभियंत्यांची खास नियुक्ती केली. मंडगे यांनी या काळात 2 कोटीहुन अधिक बीले काढल्याची चर्चा असून हांडे यांच्या बदलीनंतर त्यांचीही बदली होण्याचा योगायोग जुळून आल्याने मंडगे यांचाही कार्यकाल संशयास्पद मानला जात आहे. यावर अधिक प्रकाशझोत उद्याच्या अंकात...
चौकट
हांडेंविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे सात
तर एसीबीकडेही तक्रारींचा पाऊस
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांच्या कार्यपध्दतीविषयी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्याकडे सात तक्रारी केल्या आहेत. मंत्रालय डेब्रीज घोटाळ्याची चौकशीही मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार करीत आहेत. याशिवाय लाच प्रतिबंधक विभाग मुंबई यांनाही रणजीत हांडे यांच्या विषयी अनेक तक्रारी प्राप्त आहेत. याविषयी विशेष वृत्तांत उद्याच्या अंकात...