भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू
गुना - मध्य प्रदेशमधील गुना येथे बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. बस बांदा येथून अहमदाबाद येथे जात असताना गुनापासून 15 कि.मी अंतरावर बस आणि ट्रकची धडक झाली. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारांसाठी नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.