पाण्यात राजकारण आणणार्यांना आडवे करू शिवसेनेचा इशारा
निळवंडे-शिर्डी-कोपरगाव या 276 कोटीच्या वाढीव पाणी योजनेंतर्गत निळवंडे धरणातुन शिर्डी कोपरगाव साठी पिण्याचे पाणी येणार आहे. हे पाणी पिण्याच्या पाण्यातुन येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या शेती पाण्यावर कुठल्याही प्रकारचा घाला घातला जाणार नाही. संगमनेरने उचलले मग तेंव्हा का गप्प बसले ? आज कोपरगावने उचलले नाही तर उद्या दुसरे कोणीतरी ते पाणी उचलणारच मग कोपरगाव का नको ? साईबांची कृपा, आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पाठपुरावा शिवसेनेचे ना. विजय शिवतारे यांची मदत यातुन हे पाणी येणार आहे. याला जर कोणी राजकारण आणुन आडवे येत असेल तर त्याला आडवे करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. निळवंडेचे कालवे झाले पाहिजे त्यासाठी शिवसेना शेतकर्यांबरोबर आहे. वेळ आली तर रस्त्यावर उतरू असे आश्वासन पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, युवा सेना शहराध्यक्ष सनी वाघ, संजय सातभाई, गटनेते योगेश बागुल, अतुल काले, पपू पडियार, पिंकी चोपडा, कालु अप्पा आव्हाड, जितेंद्र रणशुर, श्रीरंग चांदगुडे, रविंद्र कथले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार योगेश बागुल यांनी मानले.
