Breaking News

पाण्यासाठी भटकंती दाही दिशा, मग एम.आय.डी.सी येईल कशी

कोपरगाव / प्रतिनिधी ।  माहिती अधिकार कार्यकर्ते लक्ष्मण साबळे यांनी एम.आय.डी.सी. करीता कोपरगांव शहरात नरेंद्र मोदी विचारमंचचे कार्यकर्त्यांकडून जी सह्यांची मोहिम राबविण्यात येत आहे. त्याबाबत काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत, याबाबत त्यांनी पत्रक प्रसिध्द केले आहे. सदर पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, एम.आय.डी.सी. येणे ही काळाची गरज आहे, परंतु सह्यांची मोहिम राबवुन एम.आय.डी.सी. येणे शक्य वाटत नाही, त्यासाठी प्रथम पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय एम.आय.डी.सी.येणे ही अशक्यप्राय गोष्ट असल्याचे मत कोपरगांव शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण साबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केले आहे. 

सहयांची मोहिम राबविणारांस त्यांनी सवाल केला आहे की, कोपरगांव शहरात तसेच तालुक्यात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असतांना कोपरगांव तालुक्यात एम.आय.डी.सी.कशी? मंजुर होईल याबाबत जाहीर खुलासा केला पाहिजे. अन्यथा हा निवडणुकीचा स्टंट आहे की काय? असे वाटते तालुक्यात अनेक भागात टँकर सुरू असतात. पाण्या अभावी तालुक्यातील शेतकर्‍यांना शेती करणे अवघड झालेले आहे. या सर्व बाबी लक्षा घेता एम.आय.डी.सी. येईल का? जरी मंजुरी मिळाली तरी मोठे उद्योग येथे येतील का? एम.आय.डी.सी. करीता कोणत्या धरणावर पाण्याचे आरक्षण टाकता येईल, मग या भागातील शेतीचे काय? नदीवाटे येणारे पावसाचे व ओव्हरफ्लो चे पाण्यावर जायकवाडीचा हक्क आहे. तर दारणा धरणेचे पाण्यावर एक्सप्रेस कॅनॉलमार्गे जाणारे पाण्यावर मराठवाडयाचा हक्क आहे. मग एम.आय.डी.सी. साठी पाणी कोठे आरक्षीत करावयाचे आहे.