Breaking News

पाच तोळे सोन्याचे गंठण लांबवले


संगमनेर शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाजवळ एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण चोरून दोघा चोरट्यांनी धूमस्टाईलने पोबारा केला. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 
दिलीप कारभारी साळगट हे इंदिरानगर येथे राहत असून रविवारी दुपारी ते दोघे भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ते आले असता साळगट यांची पत्नी यांनी भाजीपाला घेऊन कारमध्ये बसल्या. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. एकूण ७० हजार रुपये किंमतीचे हे सोन्याचे गंठण होते. याप्रकरणी दिलीप साळगट यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम हे करत आहेत.