केंदळला अनोळखी इसमाने केला खून
राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द येथे लोणावळा परिसरातील एका आदिवासी समाजातील विष्णु पवार यांचा अज्ञात व्युक्तीने खून केला. त्यांनतर पवार यांचा मृतदेह कपड्यामधे गुंडाळून ठेवत पसार झाल्याची घटना महाराष्ट्रदिनी {दि. १ } उघडकीस आली.
तालुक्यातील केंदळ खुर्द येथे तंटामुक्तीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव यांच्या पडीक जमिनीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला. ठेकेदार भाऊराव राठोड {रा. तिसगाव ता. पाथर्डी } यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. एका ताडपत्रीच्या झोपडीत हा मृतदेह गुंढाळुन ठेवला होता. दरम्यान, आदिवासी समाजाचे सर्वच लोक लोणावळा येथील असून या लोकांना कामासाठी राठोड यांनी कोळसा तयार करण्यासाठी आणले होते. या इसमाचे खुनी पसार झाले असून पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहे.