Breaking News

द्राक्ष व्यापाऱ्याला लुटले


राहाता प्रतिनिधी - द्राक्ष व्यापारी आणि ट्रकचालकास मारहाण लुटल्याची घटना बुधवारी {दि. १} रात्री एक वाजेच्या सुमारास चितळीरोड, हुतात्मा चौकाजवळ घडली. 

मध्यप्रदेश येथील व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी राहाता येथे ट्रकमधून {क्र. एम. पी. ०९ एच. एच. ४९४८} रिकाम्या कॅरेटसह आले होेते. रात्री ते एस. पी. ट्रांसपोर्टसमोर ट्रक उभी करून झोपले असता दुचाकींवरून आलेल्या सहाजणांनी ट्रकच्या समोरील काचेवर दगड मारत काचा फोडल्या. नंतर दरवाजा उघडून आत झोपलेले ड्रायव्हर कमलेश ठाकूर व क्लिनर रवी हरी प्रसाद या दोघांना दगड व हातातील लोखंडी वस्तूने मारून जखमी केले. ड्रायव्हर ठाकूरच्या खिशातील पाच हजार रूपये व मोबाईल तसेच व्यापारी विष्णू तिवारी {सर्व रा. मध्यप्रदेश} यांच्या खिशातून पैसे काढून घेत आंबेडकरनगरमार्गे पळ काढला. पोलीसांनी जखमींना राहाता ग्रामीन रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.