आरमोरी येथे आयपीएलवर लाखोंची उलाढाल
गडचिरोली, दि. 10, मे - झटपट पैसा कमवून कमी वेळात श्रीमंत होण्याच्या नादात शहरातील नागरीक लागल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे. या हंगामात सुरु असलेल्या आयपीएल क्रिके ट सामन्यांवर शहरात मोठ्या प्रमाणात जुगार लावल्या जात आहे. याची उलाढाला लक्षावधी रुपयांच्या घरात आहे. मात्र, पोलीस प्रशासन मुग गिळून असल्याचे चित्र आहे.
आयपीएल क्रिकेट सामन्यांचा खेळ सध्या रंगात आला आहे. या खेळात मोठ्या प्रमाणात जुगार चालविल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार आरमोरी शहरात निदर्शनास येत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात शहरातील काही पानटपरीवर आयपीएल सामन्यांवर जुगार खेळल्या जात आहे. या जुगारात लहानथोर चांगलेच धुंद झाले असल्याचे चित्र सद्यस्थितीत आहेत. केवळ संपूर्ण सामन्यावर नव्हेत तर प्रत्यक चेंडूवर सट्टा लावण्याचा प्रकार सुरु आहे. शहरातील नामांकित पानटपर्या तसेच व्यावसायिकांच्या दुकानामध्ये सदर आयपीएल सामन्यांवर लाखो रुपयाचा जुगार लावला जात आहे. सदर जुगाराचे पैसे घेणारे तसेच जुगार घेणारी टोळीच शहरात सक्रीय झाली आहे.
आरमोरी शहरात दररोज सदर आयपीएल सामन्यांवर मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असून यात विद्यार्थी, युवक, नोकरदार, व्यावसायिक चांगलेच गुंतले आहेत. त्यामुळे या जुगार खेळणा- यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सदर व्यवहार केवळ फोनवर होत असल्याने याचा थांगपत्ता लागत नाही. काही युवक आपआपसातच जुगार खेळत असले तरी मोठ मोठ्या जुगाराचे म्होरके मात्र वेगळे आहेत. या जुगारात लाखोंचा व्यवहार पार पडत आहे. मात्र याचे सोयरसुतक स्थानिक पोलीस प्रशासनाला नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.