Breaking News

महाबळेश्‍वर येथील पोलो मैदान आमचेच; वन विभागाचा खुलासा

सातारा, 09 - मौजे माल्कमपेठ, ता. महाबळेश्‍वर येथील फॉरेस्ट सर्व्हे नं. 180 चे क्षेत्र 13.41 हे. आर. असून ते सातारा वन विभागाच्या मालकीचे आहे. सदर क्षेत्र हे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट नंबर 8634-अ दि. 5 नोव्हेंबर, 1896 अन्वये संरक्षित वन म्हणून घोषित केलेले आहे. आज मितीस ते वन विभागाच्या ताब्यात आहे. यापैकी पुर्वी पोलो खेळाच्या दृष्टीने सपाटीकरण करण्यात आलेले क्षेत्र जीपीएस पोलीगॉन नुसार 3.67 हे. आहे. बॉम्बे फाॅरेस्ट सर्व्हे यांचेकडील सन 1905-06 रोजीचे कार्य आयोजन विभागाकडील टोपोशिट नुसार सदरचे क्षेत्र हे नकाशामध्ये पोलो ग्राऊंड म्हणून दर्शविलेले आहे. 
माहे एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शनीय सामने खेळणेचे दृष्टीने अस्तित्वात असलेल्या 3.67 हेक्टर पोलो मैदानापैकी 183 मीटर द 128 मीटर क्षेत्रावर (सुमारे 2.34 हे.) दगड काढणे, माती टाकणे, गवत लावणे, पाणी व विज बाबत व्यवस्था करण्े आणि संरक्षणाकरीता कुंपन करणे इ. बदल करणे अपेक्षीत आहे. या क्षेत्रात झाडोरा नसल्याने वृक्षतोड करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. या क्षेत्रावरील दगड काढण्याकरीता वन (संवर्धन) अधिनियम 1980 अंतर्गत परवानगी मिळणेबाबत महराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे दिनाक 4/12/2015 चे पत्राने विनंती केली आहे. याबाबतचा निर्णय येणार आहे. निर्णय प्रप्त होताच माती भरणे, गवत लावणे आदी करता येईल. 
तयार झालेले पोलो मैदान तात्पुरत्या वापराकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांना प्रदर्शनीय सामने खेळणेकरीता एप्रिल 2016 मध्ये उपलब्ध करुन देणे शक्य होईल. 
माहे एप्रिल 2017 पासून पोलो खेळ स्पर्धेकरीता वन (संवर्धन) अधिनियम 1980 अंतर्गत 3.67 हेक्टर वन जमिनीचा वळतीकरणाचा परीपुर्ण प्रस्ताव प्रकल्प यंत्रणा म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांच्यामार्फत प्राप्त होताच पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाकडून केंद्र शासनास सादर करण्याची कार्यवाही करण्यात येईल. या क्षेत्रामध्ये एक पिसा प्रजातीचे वगळता इतर कोणताही मोठा झाडोरा अस्तित्वात नाही. प्रस्तावित वनजमीन ही हेरिटेज समितीची मान्यता प्राप्त करण्यासाठी मुख्याधिकारी गिरीस्थान नगरपरिषद, महाबळेश्‍वर यांनी सद्यस्थितीत हेरिटेज समिती अस्तित्वात नसल्याने संचालक नगररचना यांचेकडून परवानगी प्राप्त करण्याकरीता प्रस्ताव सादर केला आहे. पोलो मैदान पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात येत असल्याने उच्चस्तरीय सनियंत्रण समिती महाबळेश्‍वर यांच्याकडून मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. 
महाबळेश्‍वर येथील पोलोग्राऊंड वनजमीन संदर्भातील विषय अजून शासनस्तरावर विचारार्थ आहे. तसेच या संर्भात कोणीही वृक्षप्रेमींनी या कार्यालयाकडे  
संपर्क साधला नसल्याचेही वनविभागकडून स्पष्ट करण्यात आले आहे.