नागपूर विभागात समृद्धी महामार्गासाठी 90 टक्के जमीन उपलब्ध
नागपूर, दि. 10, मे - नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकर्यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे 90.15 टक्के जमीन उपलब्ध झाली आहे. यामध्ये नागपूर विभागातील 95.23 टक्के तर वर्धा जिल्ह्यातील 87.94 टक्के जमीन उपलब्ध झाली आहे. समृद्धी महामार्ग हा नागपूरसह विदर्भातील जनतेसाठी महत्वक ांक्षी प्रकल्प ठरणार आहे.
समृद्धी महामार्गासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील 1 हजार 43 हेक्टर जमीनीची आवश्यकता असून यामध्ये खाजगी वाटाघाटीने 802.85 हेक्टर जमीन खरेदी करावयाची आहे. तर 187.67 हेक्टर शासकीय जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. विभागातील 1 हजार 160 गटातील शेतकर्यांकडून जमीन खरेदी करावयाची असून त्यापैकी 1 हजार 006 गटातील शेतक र्याकडून 700.28 हेक्टर आर जमीन प्रत्यक्ष खरेदी करण्यात आली आहे.जमीन खरेदीसाठी शेतक-यांना614 कोटी 30 लाख 33 हजार 831 रुपये अदा करण्यात आले आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील 21 गावातील 28.42 किलोमीटर महामार्गासाठी जमीनीच्या खरेदीला सुरुवात केल्यानंतर शेतकरी सभासदांनी शासनाच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी संमतीपत्र दिल्यानंतर प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. यामध्ये 279 गट क्रमांकातील 202.19हेक्टर आर जमीनीच्या खरेदीची प्रक्रिया सुरु झाली. त्यापैकी 249 गट क्रमांकातील शेतकर्यांनी 187.15 हेक्टर आर जमीन उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शेतकर्यांना 245 कोटी 92 लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. जिल्ह्यात सरासरी 95.23 टक्के शेतकर्यांनी या प्रकल्पाला जमीन उपलब्ध करून दिली आहे तसेच 97.52 हेक्टर आर ही शासकीय जमीन असून 15.83 हेक्टर आर हे वन जमीनीचे क्षेत्र आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील एकूण 284.67हेक्टर आर जमीन उपलब्ध झाली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तालुक्यातील 34 गावातील 60.73 किलोमीटर लांबीसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु असून यामध्ये90.15 हेक्टर आर जमीन शासकीय तर 34.77 हेक्टर आर जमीन आहे तसेच 600.66 हेक्टर आर जमीन खरेदी करण्यात येत आहे. 881 गट क्रमांकातील शेतकर्यांकडून खरेदीची प्रक्रिया करण्यात आली असून त्यापैकी गटक्रमांक ातील शेतकर्यांनी 513.13 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जमीनीचा मोबदला म्हणून 368 कोटी 37 लक्ष 46 हजार 298 रुपये शेतकर्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात 87.93 टक्के जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सेलू तालुक्यातील 16 गावातील 25.16 किलोमीटर, वर्धा तालूक्यातील 10 गावातील 23.09 किलोमीटर तर आर्वी तालुक्यातील 8 गावांमधील 11.67 किलोमीटर महामार्गाच्या लांबीसाठी जमीन खरेदी करण्यात येत आहे. त्यापैकी आर्वी तालुक्यात 90.10 टक्के, वर्धा तालुक्यात 91.14 टक्के तर सेलू तालुक्यात 83.98 टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.