Breaking News

पोलीस लॉन्‍सची उभारणी करुन सामाजिक बांधिलकी जपली

पोलीस लॉन्‍स व बॅक्‍वेट हॉलची उभारणी करुन पोलीस प्रशासनाने सामाजिक बांधिलकी
जपण्‍याचे काम केले. या बहुउद्देशीय हॉलचा निश्चितच चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे केले.


पोलीस लॉन्‍स व बॅक्‍वेट हॉलचे उदघाटन पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी जिल्‍हाधिकारी
राहुल व्दिवेदी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित
माने, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे अधिक्षक पराग नवलकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे आदी
उपस्थित होते.