पंजाबमध्ये 'स्मार्ट रेशन कार्ड' याेजनेला जूनपासून प्रारंभ : अाशू
चंदिगड | पंजाबमध्ये पुढील महिन्यापासून 'स्मार्ट रेशन कार्ड' याेजना सुरू हाेत असल्याने रेशनचा काळाबाजार थांबून सरकारची फसवणूक करण्याचे प्रकार संपुष्टात येणार अाहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री भारत भूषण अाशू यांनी ही माहिती दिली. रेशनच्या धान्याचा लाभ घेणाऱ्यांचे अाधार लिंकिंग करण्यात येत असून, येत्या जूनपासून नवीन प्रणालीनुसार रेशनचे वितरण हाेणार अाहे. त्यासाठी राज्यभरातील १६ हजार दुकानांना इलेक्ट्राॅनिक पाॅइंट अाॅफ सेल यंत्रे दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.