राष्ट्रपतींचा 'डाॅक्टर अाॅफ सायन्स'ची मानद पदवी स्वीकारण्यास नकार
सिमला/साेलन | राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी साेमवारी डाॅ.वाय.एस.परमार विद्यापीठाकडून देण्यात येणारी 'डाॅक्टर अाॅफ सायन्स' मानद पदवी स्वीकारण्यास नकार दिला. 'मी तुमच्या भावनांचा अादर करताे; परंतु या पदवीसाठी पात्र नसल्याने मी ती स्वीकारू शकत नाही' असे त्यांनी या वेळी बाेलताना सांगितले. ते या विद्यापीठाच्या नवव्या पदवी प्रदान समारंभास उपस्थित हाेते. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते विविध परीक्षांत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व पदव्यांचे वितरण करण्यात अाले.