Breaking News

निपाह व्हायरसमुळे ११ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर

केरळच्या कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे (एनआयव्ही) संक्रमण झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे पीडित सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, तर २५ जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जनावरांपासून पसरणारा हा व्हायरस कोझिकोडमध्ये वटवाघळामार्फत पसरला आहे. फ्रूट बॅट म्हटले जाणारे वटवाघूळ प्रामुख्याने फळ किंवा फळांच्या रसाचे सेवन करते. 

निपाहमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण केरळमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही रुग्णालयाने निपाह व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार देऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिले आहेत. व्हायरस आणखी पसरू नये यासाठी तसेच विविध विभागांत समन्वय राखण्यासाठी राज्याचे आरोग्य आणि कामगारमंत्री कोझिकोडमध्ये तळ ठोकून बसले आहेत. दोन नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी डॉक्टरांचे एक उच्चस्तरीय पथक केरळला पाठवले आहे.