Breaking News

गांजाची लागवड करणारा जेरबंद


राहुरी: तालुक्यातील माहेगांव येथे नवनाथ वाघ या इसमाने स्वत:च्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे समजताच राहुरी पोलिसांनी डि वाय एस पी यांच्या आदेशाने धाड टाकून कारवाई करत त्याला गजाआड केले.
राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अनिल पवार यांना मिळालेल्या माहिती मिळालीनुसार ही कारवाई करण्यात आली. वाघ याच्या घरासमोरील त्याच्या शेतात गांजाची झाडे लावण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी ५० हजार रुपये किंमतीची लहान मोठी १३ गांजाची झाडे आणि पाला ताब्यात घेतला. हा मुद्देमाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. यावेळी नवनाथ उत्तम वाघ याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अंमली षधी द्रव्य मन: प्रभावी अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. पोलिस नाईक अनिल पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.