Breaking News

वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष


कोपरगांव :शहरातील नागरिकांना विविध सुविधा पुरविण्यासाठी खाजगी रुग्णालये, सरकारी बँका, सहकारी पतसंस्था, फायनान्स कंपन्या, शाळा आदी सुविधा उपलब्ध करून देत असतांनाच शहरातील वाहतूककोंडीच्या प्रश्नाकडे शासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ मोठ्या शॉपिंग कॉम्पलेक्सला बांधकाम परवाना देत असताना पार्किंगच्या जागेचे नियम धाब्यावर बसवून परवानगी दिली जात आहे. त्यामुळे खाजगी जागा मालक पार्किंग जागेतही दुकाने काढून पैसे कमावत आहेत. परिणामी सर्व कॉम्प्लेक्सचे पार्किंग हे रस्त्यांवर होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणे ही या परिसरात नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे सकाळी मोठे वाटणारे रस्ते दुपारी पाऊलवाटा झाल्याच्या दिसतात. वाहतूककोंडीच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर रस्ते सुरक्षा सप्ताहात कारवाई करुन वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.