Breaking News

सरपंचपदाच्या एका जागेसाठी सहा उमेदवारी अर्ज


राहाता : चितळी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या एका जागेसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सदस्यपदाच्या १३ जागेसाठी ३६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी चितळी ग्रामपंचायतीची निवडणूक दि. २७ मे रोजी होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी ६ आणि सदस्यपदासाठी ३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज {दि. १३} रोजी छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. दि. १६ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात चितळी हे गाव असल्याने विद्यमान आ. स्नेहलता कोल्हे आणि युवानेते आशुतोष काळे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कोपरगांव मतदारसंघात वर्चस्व कायम रहावे, यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, युवानेते सुजय विखे यांनीही ही निवडणुक राजकीय दृष्ट्याप्रतिष्ठेची केली आहे.

सरपंचपदासाठी दिपाली विष्णू वाघ, शोभा दिलीप वाघ, ज्योती दर्शन गायकवाड, विमल पांडूरंग वाघ, ज्ञानेश्वरी बाळासाहेब वाघ, सिमा कैलास वाघ या सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पाच प्रभागात सदस्यपदाच्या १३ जागांसाठी ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ३ हजार २९८ मतदार आहेत.