Breaking News

नेवासा तालुक्यात लाखो रुपयांचा गांजा जप्त


सोनई - नेवासा तालुक्यातील कौठा शिवारात टाकलेल्या छाप्यात सुमारे 1 लाख 46 हजार 300 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुपारी 2 च्या दरम्यान टाकलेल्या छाफ्यात लाखो रुपयांचा गांजा व अमोल रामभाऊ आगळे ( वय 22 रा. कौठा ) व अनिल तुकाराम पवार ( वय -50 रा. वडाळा बहिरोबा ) या आरोंपींना अटक करण्यात आली आहे. या पथकात कॉन्स्टेबल चव्हाण, धोेतरे, माने, भिंगारदिवे, थोरात यांचा समावेश होता. या आरोपींवर गुंगीकारक औषधद्रव्य व मनावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8/20/22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.