Breaking News

एका वर्षांत तब्बल 1 लाख कोटींचे गैरव्यवहार

नवी दिल्ली: 2017-18 आर्थिक वर्षात तब्बल 1 लाख कोटींचा गैरव्यवहार झाल्याची माहिती उघड झाली आहे. 2017-18 आर्थिक वर्षात तब्बल 3 लाख गैरव्यवहार झाल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. आर्थिक गैरव्यवहार करणार्‍यांना चाप लावण्यासाठी सरकारने अनेक कडक पावली उचलली होती. मात्र तरीही अशा प्रकारे गैरव्यवहार होत असल्याने सरकार आता काय कारवाई करणार हे पाहण महत्वाचे ठरणार आहे. आयकर विभागाची 2017-18 अर्थिक वर्षात अवैधरित्या झालेल्या व्यवहाराची माहिती 2017-18 ला जवळपास 3 लाख अवैधरित्या व्यवहार झाले. हे व्यवहार जवळपास 1 लाख कोटी रुपयांचे झाले असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.