Breaking News

कानिफनाथ सेवा आश्रमातर्फे सर्वरोग निदान शिबिर

कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव येथील ओम चैतन्य कानिफनाथ सेवा आश्रमाच्या ओम चैतन्य कानिफनाथ व शिव गोरक्ष मंदीराच्या प्रथम वर्धादिनानिमित्त दि. ११ रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे मठाधिपती मंहत श्री.श्री. १००८ योगी राजेंद्रनाथ महाराज यांनी दिली. दरम्यान, शनिवारी {दि. १२} भागवताचार्य स्वामी अरुणगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. सर्वरोग निदान शिबिर आणि अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आश्रमाच्यावतीने करण्यात आले आहे.