दुष्काळी संगमनेरमध्ये शेततळ्यांद्वारे जलक्रांती!
आ. थोरात यांनी राज्याची विविध मंत्रीपदे भूषवित असतांना कर्तृत्वातून राज्यभर ठसा उमटविला. महसूलमंत्रीपदाच्या काळात या खात्याला लोकाभिमूख करतांना ऑनलाईन सातबारा या निर्णयासह सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत विविध नवनवीन उपक्रम राबविले. पाटबंधारे मंत्रीपदाच्या काळात निळवंडे धरण मार्गी लावले. तर शिक्षणमंत्री म्हणून शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला. सलग सहा वर्षे कृषीमंत्री असतांना राज्यात १ लाख शेततळी निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय माजीमंत्री थोरात यांनी घेतला. याचा लाभ घेत राज्यात राज्यात मोठया संख्येने शेततळयांची निर्मिती झाली. यातून खर्या अर्थाने जलक्रांती होऊन पाण्याचे व ठिबक सिंचनाचे महत्व वाढीस लागले.
संगमनेर तालुक्यात शेततळ्यांची ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राज्यभर राबविली गेली. शेततळ्यामुळे दुष्काळी जनतेला पाण्यासाठी या माध्यमांतून मोठा पर्याय उपलब्ध झाला. पावसाळ्यात या शेततळ्यांमध्ये पाणी साठवून उन्हाळ्याात तेच पाणी काटकासरीने वापरणे, हा उपक्रम संपूर्ण रायासह संगमनेर तालुक्यात सुरु झाला. संगमनेर
चौकट
नवा आदर्श ‘संगमनेर पॅटर्न’
तालुक्याच्या अवर्षणप्रवण गावांत सुमारे ३ हजार शेततळे व ठिबक सिचंनाच्या माध्यमातून ७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे पीक घेण्यात आले आहे. या तळ्यांच्या माध्यमातून फळबागांसाठी दिड हजार कोटी लिटर सुरक्षित पाण्याची क्षमता निर्माण झाली आहे. येथील शेतकरी पाणी बचत व पाण्याचा काटकसरीने वापर करत आहेत. त्यामुळे दुष्काळात एक नवा आदर्श राज्यापुढे उभा राहिला आहे. यातून शेततळ्यांचा ‘संगमनेर पॅटर्न’ नावारूपास आला आहे.