गोल्डन ग्रुप’द्वारे समाजकार्य करण्याचा ‘त्यांनी’ केला निर्धार!
राहुरी विशेष प्रतिनिधी - येथील राहुरी महाविद्यालयात सण १९९० ते १९९५ या कालावधीत पदवी घेऊन ‘ते’ बाहेर पडले. मात्र त्यानंतर दैनंदिन धावपळीत एकमेकांशी भेटणे तर दूर, साधे बोलणेही कठीण झालेल्या या काळात तब्बल १२० जणांनी ‘गोल्डन ग्रुप’द्वारे एकत्र येऊन समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार करत आनंदोत्सव साजरा केला.
४० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या येथील कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी जिल्ह्यातच नव्हे तर रोजगार आणि व्यवसायानिमित्त राज्यात विखुरलेले आहेत. या सर्वांना एकत्र करण्याचा निर्णय राज्य समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मछिंद्र गुलदगड, शशिकांत शेळके, प्रा. मीरा देठे, (तिडके), सातारा, पत्रकार प्रसाद मैड या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘गोल्डन ग्रुप’ स्थापन केला. या सर्वांनी आठ महिन्यांत पदवी घेऊन बाहेर पडलेल्या सहकार्यांशी संपर्क करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाने एकमेकांचे पत्ते फोन नंबर गोळा करीत संपर्क साधला. यातून राहुरी महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. संजय इघे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. मीरा देठे यांनी केले. यावेळी राजू नरोडे, संजीवनी साळवे, प्रा. विजय वराळे, ज्ञानेश्वर गुरव, अरुणा डावखर, चिंधे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजन पार पडले.