Breaking News

कंदर येथे डॉक्टरला मारहाण; दोघांवर गुन्हा


सोलापूर - महिला डॉक्टरच्या केबिनमध्ये दोघांनी प्रवेश करून हाताला धरून गळ्यातील सोन्याचे अडीच तोळ्याचे गंठन आणि पर्स मधील तीन हजार रुपये जबरदस्तीने घेऊन मारहाण करून विनयभंग केल्याची घटना करमाळा तालुक्यातील कंदर येथे घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
 
राजश्री मोरे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी पतीसह परितेवाडी येथे राहत आहे. परितेवाडी येथून कंदर येथील दवाखान्यात आली असताना रुग्णाला तपासत होते. त्यावेळी कंदर येथील दादा बाळू लोंढे आणि भागवत बापू माने यांनी सकाळी अकरा वाजता यांनी दवाखान्यात प्रवेश करून दरवाजा आतून बंद केला. 

दादा लोंढे यांनी मला हाताला धरून ढकलून दिले. दारात उभा असणार्‍या भागवत माने यांनी काठीने उजव्या हाताच्या मनगटावर, तळहातावर छातीवर मारहाण केली. दादा लोंढे यांनी माझ्या हाताला धरून दोघांनी गळ्यातील सोन्याचे गंठन आणि पर्स मधील तीन हजार पाचशे रुपये काढुन घेतले. दवाखान्याला बाहेरून कुलूप लावले आणि त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमुद केले आहे.