Breaking News

पावसाळ्यापूर्वी करायची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा - मुक्ता टिळक


पुणे - पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील नाला बेसिनची अवघी 50 टक्के काम पूर्ण झाली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यावर नालेसफाई, ओढे-नाल्यातील राडारोडा उचलणे, नदीतील घनकचरा व प्लॅस्टिक कचरा उचलणे आदी पावसाळ्यापूर्वी करायची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. पावसाळयापुर्वीच्या कामा संदर्भात महापौर मुक्ता टिळक यांनी बैठक घेतली.


कात्रज व पाषाण तलावात जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. नदीपात्रात जलपर्णी काढण्यासाठीची पारंपरिक यंत्रणा कुचकामी ठरते प्रशासनाने या विषयात गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. नदीपात्रातील गाळ, घनकचरा व कचरा काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गाळ काढण्यासाठी पाटबंधारे खात्याची मशिनरी उपलब्ध व्हावी यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. कल्व्हर्ट दुरूस्तीचे काम पथ विभाग पूर्ण करावीतखड्डे दुरूस्तीचा कालबध्द कार्यक‘म ठरवावा व शास्त्रशुध्द पध्दतीने खड्डे बुजवावेत. पथ विभाग, डे्रनेज विभाग व वॉर्ड ऑफिस या विभागांनी समन्वयातून काम करण्यात येणार आहे. पावसाळ्यापर्यंत शहरात कुठेही खोदाईला परवानगी नाही. 25 मे रोजी आपत्कालिन व्यवस्थापनाची बैठक घेतली जाणार आहे.