Breaking News

खडसेंना क्लीनचीट मिळल्याने खान्देशात जल्लोष


जळगाव, दि. 3, मे - भोसरी जमीन प्रकरणात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी मंत्री एकनाथराव खडसेंना क्लीनचीट दिल्यानंतर खान्देशातील खडसे समर्थकांनी महाराष्ट्रदिनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. तब्बल दोन वर्षांपासून मंत्री पदापासून पायउतार असलेल्या खडसेंमागे चौकशींचे सत्र सुरू असतानाच एसीबीने त्यांना क्लीनचीट देत त्यांनी पदाचा कुठलाही दुरुपयोग केला नसल्याचा अहवालही दिल्याने कार्यकर्ते सुखावले आहेत तर आता नाथाभाऊंची पुन्हा मंत्री पदावर वर्णी लागावी, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.