श्रीमती सु.ग. लंके विद्यालायास कर्मवीर पुरस्कार प्रदान
सुपा : तालुक्यातील वडझिरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती सु. ग. लंके माध्यमिक व आ. ना. एरंडे उच्च माध्यमिक विद्यालयास यंदाचा उत्कृष्ट कार्याबद्दल उत्तर विभागातून आदर्श विद्यालयाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील मुख्य कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आ. शिवेंद्रसिंह राजेभोसले यांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य दि. बी. गोसावी, वडझिरे गावचे सरपंच शिवाजी औटी, पर्यवेक्षक आर. डी. जगताप व सर्व सेवकवृंद यांनी हा पुरस्कार स्विकारला, यावेळी व्यासपीठावर डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील व विभागीय अधिकारी एस. पी. ठुबे उपस्थित होते.
विद्यालयाने नुकतेच पूर्ण केलेली संरक्षक भिंत, मैदानी सपाटीकरण, मुलींचे स्वच्छता गृह, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न, उत्कृष्ट निकाल, विद्यालयाचा सर्वागीण विकास यासर्व प्रगतीमुळे संसथेचे परीक्षण करून पुरस्कारासाठी निवड केली होती. ग्रामस्थांमधून पालकांमधून परिसरातून विद्यालयाचे कौतुक होत आहे.