Breaking News

शेतकरी संघटनांच्या असंघटीतपणामुळे शेतकरी संपाच हत्यार बोथट

कृषीप्रधान देशामध्ये शेतकर्‍यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज भाजते ही दुर्देवी बाब असून, शेतकरी संघटनांमध्ये एकजूट नसल्याने शेतकर्‍यांच्या संपाच हत्यारच बोथट होत चाललं असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.


गेल्या वर्षी 1 जून रोजी पुणतांब्याने शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍न घेवून पुकारलेल्या संपात शेतकरी प्रथमच एकजुटीने उतरला, मात्र शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता मागण्या पुर्ण न होताच यशस्वी होणारा संप मागे घेण्यात आला. तो दिवस खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांसाठी काळा दिवस ठरला.यावर्षी देखिल अनेक शेतकरी संघटनांनी वेगवेगळे विषय घेवून वेगवेगळ्या दिवशी असंघटीतपणे राज्यव्यापी, देशव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे, मात्र या आंदोलनकर्त्यांमध्ये एकजूट दिसत नाही.शेतकर्‍यांचे ज्वलंत प्रश्‍न जैसे थे राहतील की काय? असा प्रश्‍न शेतकर्‍यांमध्ये निर्माण होत आहे, सत्ताधारी शेतकरी संघटनांच्या असंघटीतपणाचा फायदा घेवुन शेतकर्‍यांचा राग कसा शांत होईल व पुन्हा शेतकर्‍यांचा पुन्हा विश्‍वास निर्माण करुण सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करेल.
परंतु ज्या पद्धत्तीने शेतकरी संघटनांच्या असंघटीतपणामुळे शेतकर्‍यांच्या संपाच हत्यार बोथट होत चालल्यामुळे शेतकर्‍यांना त्याच्या घामाचं दाम मिळेल का असा प्रश्‍न याठीकाणी निर्माण होत आहे. याचा विचार शेतकरी नेत्यांनी करायला हवा व एकजूटीने आपल्या हक्कासाठी तीव्र लढा उभा करणे गरजेचे असल्याचेही शरद पवळे यांनी सांगितले.