Breaking News

आ. राहुल जगतापांमुळे 33 गावांचा जलयुक्तमध्ये समावेश

आ. राहुल जगताप यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नगर तालुक्यातील 33 गावांचा सन 2018-19 च्या जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाला आहे. जलयुक्तच्या कामांमुळे या लाभधारक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडविले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नगर तालुका उपाध्यक्ष शरद बडे यांनी दिली. अधिक माहिती देताना बडे यांनी सांगितले की, नगर तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात बांध-बंदिस्ती, डीपसीसीटी बंधारा, तलावातील गाळ काढण्याची कामे केली जाणार आहेत.


नगर तालुक्यातील नगर मंडळ अंतर्गत निंबोडी, बुर्‍हाणनगर, वारूळवाडी, आगडगाव, बाळेवाडी, भातोडी, पारगाव, देवगाव, खांडके, माथणी, मेहेकरी, पारेवाडी, दशमीगव्हाण, कोल्हेवाडी, सांडवे, टाकळीकाझी, भिंगार, नागरदेवळे, शहापूर, रतडगाव, जांब, बाराबाभळी, सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा, तर जेऊर मंडळातील नागापूर, वडगावगुप्ता, निंबळक, इसळक, देहरे, कोळपे आखाडा विळद, खारे कर्जुने, शिंगवेनाईक, इस्लामूर, नांदगाव या गावांचा प्रामुख्याने जलयुक्तमध्ये समावेश करण्यात आला असून, लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे बडे यांनी सांगितले.
पाण्याबाबत सतत संघर्ष करणारे शेतकरी यांना कुकङीच्या पाण्याबाबत सतत संघर्ष करावा लागत आहे, पण पाठराखण करणे हे माझे कर्तव्य आहे ती लढाई आपण पार करणार असून वंचितासह सर्व शेतकरी यांची तहान भागूनच पुढे पाणी जाईल तसे न झालेस कुकडी वितरीका 14 नंबर पासून आदोलन करू असा इशाराच आ. राहूल जगताप यांनी दै. लोकमथंनशी बोलताना दिला.