वैराग येथील जुगार व मटका अड्ड्यावर छापा, दहा जण ताब्यात
सोलापूर, दि. 07, मे - वैराग पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना वैराग शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. वैराग ते धामणगाव रस्त्यावर पानगावकर यांच्या शेतात आंब्याच्या झाडाखाली जुगार खेळणार्या दहा जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील रोख रक्कम व वाहने असे मिळून 2 लाख 27 हजार 570 रुपयांचा ऐवज जप्त केला. जुगार खेळताना सुनील घोडके, प्रकाश शिनगिरे, योगेश चिकले, नागेश मोरे, शशिकांत पवार, नारायण कापसे, विजय जाधव, राजेंद्र म्हेत्रे, सुनील मनगिरे यांना ताब्यात घेतले. यावेळी मटका घेणारा धनंजय करंडे यास ताब्यात घेतले. 11 आरोपींविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला.