Breaking News

दरोडेखोरांची टोळी पोलिसांनी केली जेरबंद


राहुरी ता. प्रतिनिधी - दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी आज {दि. ४ } पहाटे जेरबंद केले. या अट्टल गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत भारत भाऊसाहेब ढोकणे {रा. जुने बसस्थानकजवळ}, स्वप्निल नामदेव कुसमुडे {रा. मल्हारवाडी रोड}, ओमकार नितिन कोरडे {रा. करपे इस्टेट}, शिवा सुनिल नागरे {रा. भाग्यश्री हाँटेल मागे}, दिपक बाबासाहेब कोरडे {रा. जुना कणगर रोड}, ओंकार सुनिल डहाके {रा. कोळीवाडा } या अट्टल गुन्हेगारांना अटक केली. शहर हद्दीतील नगर मनमाड रोडलगतच्या ग्रीन हाँटेल ते रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रोडलगतच्या विजत फेब्रिकेशनजवळ झाडाच्या आडोशाला हे सर्वजण दरोड्याच्या तयारीत दबा धरुन बसले होते.