Breaking News

सुरक्षेविषयी जनजागृतीसाठी उद्योजक व कर्मचार्‍यांसाठी कार्यशाळेचे आयोजन.



डोंबिवली, दि. 13, मे - आपत्कालीन व्यवस्थापन, उत्पादन सातत्य आणि औद्योगिक सुरक्षा याविषयी उद्योजक व कर्मचार्‍यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याने कार्यशाळेचे आयोजन क रण्यात आले होते. सदर कार्यशाळेला सुमारे शंभर प्रतिनिधी सहभागी झाले होते. शनिवारी डोंबिवली कल्याण अंबरनाथ मँन्युफँक्चरस असोशिएशनच्या (कामा) एमआयडीसी कार्यालयात पार पडलेल्या कार्यशाळेत तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.आयोजित केलेल्या पुर्ण दिवसीय कार्यशाळेत पहिल्या सत्रात कामाचे अध्यक्ष मुरली अय्यर यांनी प्रस्ताविक केले. यावेळी त्यांनी कार्यशाळेत घेतल्या जाणार्‍या विषयाचा हेतु स्पष्ट केला.


 
एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे सल्लागार व मुख्य अधिकारी संतोष वारीक यांनी आग प्रतिबंधन व सुरक्षा यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कल्याण डिशचे संचालक एस. एस. जोशी यांनी औद्यो गिक कायद्यात अग्नीसुरक्षा कायद्याच्या तरतुदीबाबत महत्त्वाची माहिती दिली. उत्पादनासोबत मानवी जिवाची सुरक्षा घेण्याची जबाबदारी उद्योजकाची व कंपनीची असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय स्थानिय स्वराज्य संस्थेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख संजीवन जोशी यांनी आपत्कालीन परिस्थिती व उत्पादन सातत्य राखण्याविषयी मार्गदर्शन केले.
दुसर्‍या सत्रात विक्री विभागाचे उपाध्यक्ष विनय निळे यांनी औद्योगिक स्मार्ट सिटीचे पुनरुज्जीवन करण्यविषयी सादरीकरण केले.