Breaking News

रामदास आठवलेंनी घेतली छगन भुजबळ यांची भेट


मुंबई, दि. 13, मे - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांच्या तब्येतीची चौकशी रामदास आठवले यांनी केली. यावेळी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.