Breaking News

माढ्यातील शिक्षकांचे आठ महिन्यांचे वेतन देण्याचे आदेश


सोलापूर - शहरातील जिल्हा परिषद प्रशालेमधील 24 शिक्षक आणि आठ शिक्षकेतर कर्मचारी अशा 32 जणांचे वेतन ऑफलाइन देण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी दिल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली. आठ महिन्यांपासून वेतन थकले होते. त्यानंतर 16 मे रोजी आ. शिंदे यांनी शालेय शिक्षण विभागाचे सचिव ए. के. नंदकु मार यांची भेट घेऊन हा प्रश्‍न मांडला. 

तसेच ऑफलाइन वेतन काढण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांना आदेश देण्याची मागणी केली. त्यांनी पाच ते सहा दिवसांत आदेश देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शालार्थ प्रणाली बंद असल्याने ऑफलाइन वेतन देण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिव चौधरी यांनी दिले. दरम्यान, प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाइन माहिती भरली होती. परंतु त्यात त्रुटी होत्या. त्यामुळे मुदतीत माहिती भरता न आल्याने वेतन करण्यात अडचण निर्माण झाली होती. वेतन न मिळाल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले होते.