Breaking News

ग्रामीण डाक सेवकांचे बेमुदत आंदोलन सुरू


सोलापूर- ग्रामीण भागात डाक सेवेत काम करणार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, डॉ. कमलेश चंद्र नावाची कमिटी आहे. हा आयोग लागू होताना दिलेले आदेश डाक प्रशासनाने आहे तसे पाळावेत यासाठी प्रधान डाक घर, रेल्वे स्टेशन येथे ग्रामीण डाक सेवकांनी आंदोलन केले. 

डाक विभागातील 2 लाख 73 हजार ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर जात आहेत. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना महासचिव एस. एस. महादेवय्या यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त कृती संघटना एनयूजीडीएस संघटनेचे महासचिव मुरलीधरन, एनएफपीई - जीडीएसचे महासचिव पांडुरंग राव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण डाक सेवकांना डॉ. कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारशी लागू क राव्यात या मागणीसाठी बेमुदत संपावर जात आहेत. या संपामुळे ग्रामीण भागातील 1 लाख 33 हजार डाक-घरे बंद आहेत. विभागातील सर्व टपाल वितरण व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. सोलापूर व पंढरपूर विभागातील 831 कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत. तसेच हा संप शंभर टक्के यशस्वी झाला असल्याचे राजकुमार आतकरे यांनी सांगितले आहे.